Mahadbt Farmer Scheme List in Marathi ‘maha dbt shetkari yojana’: कसकाय माझ्या सर्व शेतकरी मित्रांनो आज येथे आपण महाडीबीटी पोर्टल वर राबवल्या जाणाऱ्या Shetkari Yojana Maharashtra 2022-23 ची संपूर्ण माहिती या लेखात घेणार आहोत. चला शेतकरी मित्रांनो आता पाहुयात, महाडीबीटी पोर्टल अर्थात महाराष्ट्र सरकार अंतर्गत शेतकऱ्यांसाठी कोण-कोणत्या अनुदान योजना राबवल्या जात आहेत, तसेच महाडीबीटी पोर्टल शेतकरी योजना २०२२ अंतर्गत कोणसाठी आणि काय अनुदान योजना आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला या सर्व शेतकरी अनुदान योजनांचा पूर्णपणे लाभ घ्यायचा असेल तर, हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा आणि लाभ घ्या….
महाडीबीटी पोर्टल शेतकरी योजना : यावर्षी महाराष्ट्र सरकारच्या वतीने शेतकऱ्यांसाठी अनेक योजनांचे आयोजन केले आहे. जर अधिक माहिती पाहिजे असेल तर तसे आमाला कॉमेंट करा किंवा वेबसाईट वर ॲक्टिव रहा. आमच्या साइट वर तुम्हाला सर्व शेतकरी योजना लगेच जाणून भेटतील.
महाडीबीटी पोर्टल शेतकरी योजना सरकारच्या द्वारे कृषकांना साधने आणि सुविधे उपलब्ध करण्याचा उद्देश आहे. या योजनेत कृषकांनी संपूर्ण कृषि सामग्री, उपकरणे, सल्ले आणि सर्व तसेच संबंधित सुविधे उपलब्ध करणे होते.
1. कृषी यांत्रिकीकरण उप अभियान योजना
महाराष्ट्र सरकार कडून कृषी यांत्रिकीकरण किंवा अभियान योजना या महाडीबीटी पोर्टल २०२२-२३ वरती राबवल्या जाणाऱ्या योजनेच्या अंतर्गत कृषी यांत्रिकी करण्याचे प्रोत्साहन दिले जाणार आहेत. तसेच या योजने अंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांच्या शेतीमधील ऊर्जेच्या वापराचे प्रमाण दोन किलो वॅट पर हेक्टर पर्यंत वाढवणे शक्य होणार आहे. या योजनेचा पूर्णपणे लाभ अल्प किंवा अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना पर्यंत पोचवणे. तसेच ज्यांना शेती मध्ये उर्जेचा कमी वापर करून जास्त उत्पादकता वाढव्हायचा आहे त्यांनी, या योजनेचे पूर्णपणे लाभ घ्यावा या योजनेचा हा मुख्य उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र महाडीबीटी पोर्टल 2022 अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या कृषी यांत्रिकीकरण उप अभियान योजनेचे उद्दीष्ट, हे कृषी यंत्र किंवा अवजारे यांच्या खरेदीसाठी अर्थ सहाय्य देऊन कृषी यांत्रिकी करणास अधिक प्रोत्साहन करणे हे आहे.
या योजनेच्या अंतर्गत, कृषी यांत्रिकीकरण उप अभियान अनुदान योजनेच्या अंतर्गत खालील अवजारांच्या खरेदीसाठी महाराष्ट्र शासनाकडून अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.
- ट्रॅक्टर
- पॉवर टिलर
- ट्रॅक्टर/ पॉवर टिलर चलित अवजारे
- बैल चलित यंत्र/अवजारे
- मनुष्य चलित यंत्र/अवजारे
- प्रक्रिया संच
- काढणी पश्च्यात तंत्रज्ञान
- फलोत्पादन यंत्र/अवजारे
- वैशिष्ट्यपूर्ण यंत्र अवजारे
- स्वयं चलित यंत्रे
- भाडे तत्वावरील सुविधा केंद्र
- कृषि अवजारे बँकेची स्थापना
- उच्च तंत्रज्ञान , उत्पादन सेवा सुविधा केंद्राची स्थापना
2. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या अंतर्गत सर्व लाभार्थी शेतकऱ्यांना तुषार सिंचन आणि ठिबक सिंचन या दोन सूक्ष्मसिंचन वापरासाठी अनुदान दिले जाणार आहे या योजनेत. प्रधानमंत्री कृषी ठिबक सिंचन योजना किंवा तुषार सिंचन योजनेच्या अंतर्गत अल्प किंवा अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 55 टक्के अनुदान देण्यात असेल तर इतर शेतकऱ्यांसाठी 45 टक्के अनुदान देण्यात असणार आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील साइट वर जावे आणि आपले नाव नमूद करावे:-
Online 2023-24 अर्ज प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अनुदान संपूर्ण माहिती
3. राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान (अन्नधान्य, तेलबिया, ऊस आणि कापूस)
महाराष्ट्र सरकार च्या या राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान योजनेचा अंतर्गत शेतकऱ्यांना बियाणे वितरण, एकात्मिक कीड व्यवस्थापन (औषधे, जैविक घटक, तणनाशके), एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, वैयक्तिक शेततळे, पाईप, पंप संच असे विविध कृषी अवजारे या घटकांसाठी देण्यात येत आहेत. या योजनेचा पूर्ण लाभ घ्या महाराष्ट्र पोर्टल वर.
4. बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना (आदिवासी उपयोजना किंवा आदिवासी उप योजना बाह्य)
बिर्सा मुंडा कृषी क्रांती योजना या योजने अंतर्गत जमिनीत ओलावा टिकूवून ठेवण्याच्या दृष्टिकोनातून तसेच विविध सिंचनांची सोय उपलब्ध करून देऊन, सर्व शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी महारष्ट्र सरकार ने बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना ही आदिवासी शेतकऱ्यांच्या साठी राज्य शासनाच्या कृषी विभागा मार्फत संपुर्ण महार्षत्रात राबवण्यात येत आहे.
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत येणाऱ्या विविध खालील बाबींसाठी महाराष्ट्रराज्य शासनाकडून अनुदान देणार आहे.
- जुनी विहीर दुरुस्तीसाठी – रुपये ५० हजार
- नवीन विहिरीसाठी – रुपये २.५० लाख
- बोरिंग साठी – रुपये २० हजार
- पंप संचासाठी – रुपये २० हजार
- वीज जोडणी साठी – रुपये १० हजार
- सूक्ष्म सिंचन संच यामध्ये ठिबक सिंचनासाठी – रुपये ५० हजार किंवा तुषार सिंचन संचासाठी – रुपये २५ हजार
- पीव्हीसी पाईप साठी – रुपये ३० हजार
- परस बागेसाठी – रुपये पाचशे
अशाप्रकारे या योजनेच्या अंतर्गत अनुदान देण्यात येणार आहे. संपुर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये ‘बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना’ मुंबई, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, सांगली व कोल्हापूर हे सर्व जिल्हे वगळता राज्यातील इतर सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येणार आहेत.