Online 2023-24 अर्ज प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अनुदान संपूर्ण माहिती

Thibak Sinchan Tushar Sinchan Anudan Yojana 2022-2023 : नमस्कार माझ्या सर्व शेतकरी मित्रांनो, आपण आज या लेखात प्रधानमंत्री द्वारे ‘कृषी सिंचन योजना’ या योजनेचा आपल्या सर्व शेतकरी बांधवांनी कसा लाभ आपल्या शेतीसाठी करून घेयचा या बाबत तसेच त्यासाठी या योजनेचा अर्ज कुठे दाखल करायचा, लाभ घेण्यासाठी लागणारे कागदपत्रे ,लाभ सर्व शेतकऱ्यांना घेता येईल का फक्त काही ठराविक?,या योजनेवर लागू असणाऱ्या अटी तसेच या योजनेचा अंतर्गत शेतकर्याना जल सिंचनाच्या कोणत्या गोष्टी मिळणार आहेत, ह्या सर्वांची माहिती पाहणार आहोत. त्यासाठी मित्रानो संपूर्ण लेख वाचा आणि पूर्ण माहिती घ्या…..


150 कोटी अनुदान मंजूर 2023 GR !! लवकर पहा कोणत्या प्रलंबित निवड झालेल्या लाभार्त्यांना अनुदानाचा होणार लाभ !!

Online 2023-24 अर्ज प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अनुदान संपूर्ण माहिती


प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अनुदान 2023 

पाण्या मार्फत शेती करण्या साठी पुरेपूर वापर करण्यासाठी शेतकऱ्यांना महाराष्ट्र राज्य सरकारने जलसिंचना ची सूक्ष्म सिंचन योजना राबवली आहे. ज्यामधून कमी पाण्यात शेतकऱ्याना भरपुर उत्पादन घेता येईल. त्यासाठीच महाराष्ट्र राज्य सरकारने ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन योजने राबवली आहे.


Thibak Sinchan

छोट्या नळीद्वारे झाडाच्या मुळापासून झाडाला थेंब थेंबने पाणी देण्याची आधुनिक सिंचन प्रणाली म्हणजे ठिबक सिंचन प्रणाली. या आधुनिक ठिबक सिंचन प्रणालीमुले कमी पाण्यात सुद्धा पीक चांगले तयार होते. थेंबा थेंबाने पाणी दिल्यामुळे पाणी थेट मुळापासून झाडाच्या प्रत्येक पिका पर्यंत जाते आणि झाडाची पाण्याची गरज पुरेपूर भागवली जाते. ही गोस्ट लक्ष्यात घेवून, महाराष्ट्र राज्य शासनाने त्याचा लाभ आपल्या शेतकऱ्यांना करून घेता यावा, याच उद्देशाने हि योजना राबवली आहे. तसेच महाराष्ट्र राज्य हा ठिबक सिंचनात अग्रेसर, असून ६2% ठिबक सिंचन एकट्या महाराष्ट्रातच केले जात आहे.


Tushar Sinchan

ही दुसरी सिंचन प्रणाली आहे, तुषार सिंचन प्रणालीद्वारे झाडांना पंप, स्पिंकलर्स, वॉल्व्ह आणि पाईप्सद्वारे पाणी दिले जाते, व हे सुध्दा कमी पाण्यात चांगली शेती करण्याची जल सिंचन प्रणाली आहे. या सिंचनाचा वापर औद्योगिक शेतीसाठी केला जाऊ शकतो. या सिंचन प्रणालीद्वारेही पाणी अतिशय कमी प्रमाणात वापरले जाते तसेच तेही थेट पिकाच्या मुळाशी जाते.

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजने अंतर्गत खालीलप्रमाणे अनुदान शेतकऱ्याला देण्यात येणार आहे :

शेतकरी मित्रानो, अल्प व अत्यल्प भूधारक सर्व शेतकऱ्यांना ५५%  अनुदान तुषार सिंचन व ठिबक सिंचनावर मिळणार आहे. तर इतर सर्व राहिलेल्या शेतकऱ्यांना ४५% अनुदान मिळणार आहे.


पात्रता

 जर प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेसाठी अर्ज करावयाचा असेल, तर खालील शेतकऱ्यांची पात्रता असणे अनिवार्य आहे, जाणून घ्या :


  • शेतकऱ्याचे आधार कार्ड असणे गरजेचेच आहे .
  • तसेच त्या शेतकऱ्याकडे ७/१२ प्रमाणपत्र व 8-अ प्रमाणपत्र असणे गरजेचे आहेत .
  • अर्जदार शेतकरी अनुसूचित जाती-जमातीचा असल्यास जातीचा दाखला आवश्यक आहे.
  • अर्जदार शेतकऱ्याकडे विद्युत पाण्याच्या पंपासाठी लागणारी विद्युत जोडणी आवश्यकच आहे. त्यासाठी शेतकऱ्याना वीज बिलाची ताजी पावती सादर करणे गरजेचे आहेच.
  • जर अर्जदार शेतकऱ्याने २०१६-१७च्या आधी अश्या योजन्यांचा लाभ घेतला असेल तर पुढील १०वर्ष तरी त्या सर्व्हे नंबर साठी त्या शेतकऱ्याला या योजनेचा लाभ घेता येणार नाही याची नोंद सर्वांनी घ्यावी.
  • सर्व शेतकऱ्यांना ५ हेक्टरच क्षेत्राच्या मर्यादेतच या योजनेचा लाभ देण्यात येईल.
  • फॉर्म भरल्यानंतर शेतकरयाला सिंचन प्रणाली विकत घेण्यासाठी  पूर्वमंजुरी मिळाल्यावर, पुढील कार्य करावे जसे अधिकृत विक्रेत्याकडून सिंचन विकत घेऊन ३० दिवसामद्ये त्याच्या पावत्या साईट वर अपलोड कराव्यात. 

जर काही अडचण असेल तर आम्ही आहोतच, आम्हाला कॉमेंट करा वेळ मिळताच आम्ही रिप्लाय करू. आणि आपल्या शेतकरी मित्रांसोबत हा लेख जास्तीत जास्त शेअर करा. 


Leave a Comment